‘वसाका’ची विशेष सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:25 AM2020-12-03T04:25:53+5:302020-12-03T04:25:53+5:30

कळवण : कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र व प्रमुख अर्थकारण असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद, ...

Demand for permission to hold a special meeting of ‘Vasaka’ | ‘वसाका’ची विशेष सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी

‘वसाका’ची विशेष सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी

Next

कळवण : कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र व प्रमुख अर्थकारण असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक व कामगार यांची संयुक्त विशेष सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी पुणे येथील राज्याचे साखर आयुक्त व सहकार आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वसाका कारखाना थकीत कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने जप्त केला असला तरी ही बँकेची अंतिम मालमत्ता नाही, बँकेने परस्पर कारखाना धाराशिव साखर उद्योग उस्मानाबाद यांना प्रदीर्घ कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेला आहे. महाराष्ट्र शासन नियुक्त प्राधिकृत मंडळ बरखास्त करण्यात आले असल्याने कारखाना व्यवस्थापनात सभासद प्रतिनिधी नाही. धाराशिव साखर उद्योगावर सभासदांचा विश्वास नाही, अवसायक आपली जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरले आहेत. गळीत हंगाम यशस्वी करणे याबरोबरच आगामी धोरण सभासदांचा विश्वास, नवीन ऊस लागवड, शासन व कारखाना प्रोत्साहन योजना, सभासदांना किफायतशीर दरात साखर, सुरू असलेले कामकाज, शंका इतर अडीअडचणी याबाबत व्यवस्थापनाशी संवाद होण्यासाठी सभासद सभा होणे आवश्यक आहे. यासाठी सदर सभेस परवानगी मिळावी व सहकार विभागाने या सभेसाठी प्रतिनिधी नियुक्त करावा, अशी मागणी देवरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जप्ती आदेश मागे घ्यावा...

राज्य सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्त करून बँकेने परस्पर भाडे करार केला आहे. भाडे रक्कम कर्ज खात्यात जमा होत असताना बँकेने याचे नफा-तोटा, ताळेबंद केला असेल. यामुळे कारखान्याची मालमत्ता मुक्त करावी व बँकेने जप्ती आदेश मागे घ्यावा, अशी

मागणीदेखील निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Demand for permission to hold a special meeting of ‘Vasaka’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.