गर्दी टाळण्यासाठी नियोजनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:42+5:302021-05-24T04:12:42+5:30
ई-मेल आंदोलनाने जाचक अटींचा निषेध लोहोणेर : दहा दिवस आपण बाजार समित्या बंद करून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ...
ई-मेल आंदोलनाने जाचक अटींचा निषेध
लोहोणेर : दहा दिवस आपण बाजार समित्या बंद करून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली असून त्यातून सावरत नाही तोच खत दरवाढ झाली. त्यानंतर आठ दिवसाला आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली. या जाचक अटीच्या निषेध म्हणून ई-मेल आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात हे प्रहारचे निवेदन आहे. कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य म्हणून आम्ही खूप काही सहन केले आणि करू पण मर्यादेबाहेरचा आणि आवाक्यापलीकडचा जाचकपणा आम्ही सहन करणार नाही अशा आशयाचा मेल ddr_nsk@rediffmail.com
येथे पाठवून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अभोणा उपबाजारात आजपासून कांदा लिलाव
अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सोमवार (दि.२४) पासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे. इजिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळून कामकाज सुरु करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी प्रथम आरटीपीसीआर किंवा रॅपिड चाचणी करून घेणे आवश्यक आहे. आवारात वाहनासोबत फक्त एकाच व्यक्तीस प्रवेश असून त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचा दाखला प्रवेशद्वारावर दाखविल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. मर्यादित स्वरूपातच लिलाव होणार असल्याने पिकअप, रिक्षा आदी वाहने आणून गर्दी करू नये. मास्कचा वापर, सामाजिक अंतर तसेच सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांनी केले आहे.