प्लास्टिक फुले बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 10:31 PM2021-07-31T22:31:03+5:302021-07-31T22:32:10+5:30
जानोरी : येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी प्लास्टिक फुले बंद करावीत. ही फुले पर्यावरणास हानिकारक असून फुलशेतीही या प्लास्टिक फुलांमुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री व पर्यावरणमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.
जानोरी : येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी प्लास्टिक फुले बंद करावीत. ही फुले पर्यावरणास हानिकारक असून फुलशेतीही या प्लास्टिक फुलांमुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात जानोरी : येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी प्लास्टिक फुले बंद करावीत. ही फुले पर्यावरणास हानिकारक असून फुलशेतीही या प्लास्टिक फुलांमुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री व पर्यावरणमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.
भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे व बिंदू शर्मा यांनी जानोरी येथील एका हायटेक नर्सरीला भेट दिली. त्यावेळी जानोरीतील शेतकऱ्यांनी काळे यांना निवेदन दिले. शेती उत्पादन खर्च कसा कमी करण्यात येईल व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल, यावर केंद्रात विचार विनिमय करण्यात येत असल्याचे काळे यांनी सांगितले. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव बापूसाहेब पाटील तालुका, सरचिटणीस योगेश तिडके, माजी उपसरपंच विष्णुपंत काठे, गणेश तिडके, डी. बी. काठे, शरद घुमरे, समाधान पाटील, सागर काठे आदी उपस्थित होते.