कंपनीकडून प्रदूषणकारवाईची मागणी : ग्रामपंचायतीकडून ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:28 AM2019-12-08T00:28:34+5:302019-12-08T00:34:13+5:30
दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथील एका रासायनिक कंपनीच्या पाणी व वायू प्रदूषणामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून, सदर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी परमोरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर ठराव करत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

परमोरी येथे एक रासायनिक कंपनी असून, या कंपनीतून निघणाºया दूषित पाणी व वायूमुळे आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा व शेतमालाचे नुकसान झाले आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले असून, वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्र ार केली आहे. त्यांनी पंचनामे केले आहे, मात्र उपाययोजना होत नसल्याने येथील प्रदूषण थांबले नसून वारंवार पिकांचे नुकसान होत आहे. आता पुन्हा नितीन दिघे, विकास दिघे, धोंडीराम दिघे यांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. सदर कंपनीवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कृषी महसूल विभागातर्फेनुकतेच नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे.