आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:33+5:302021-05-29T04:12:33+5:30
या निवेदनाची दखल घेत आमदार खोसकर यांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना याबाबतची पत्राद्वारे माहिती देत सदर परीक्षा ऑनलाइन ...
या निवेदनाची दखल घेत आमदार खोसकर यांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना याबाबतची पत्राद्वारे माहिती देत सदर परीक्षा ऑनलाइन प्रणालीनुसार घेण्यात याव्यात किंवा स्थगित करण्यात येऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
कोरोना व म्युकरमायकोसिस या आजारांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासह अनेक तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील अनेक आरोग्य महाविद्यालयांतील, तसेच वसतिगृहातील विद्यार्थी कोरोनाबाधित झाले असून, पुन्हा या काळात परीक्षा घेण्यात आल्या तर हा आकडा अधिक वाढू शकतो, असे छात्रभारतीचे विद्यार्थी प्रतिनिधी रूपेश नाठे यांनी निवेदनात म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असेही साकडे घालण्यात आले आहे.
कोट.....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद असून अजूनही ठिकठिकाणी रुग्ण आढळून येत असल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा घेणे उचित ठरणार नाही. सदर परीक्षा ऑनलाइन प्रणालीनुसार अथवा पुढे ढकलण्यात याव्यात, याबाबतची मागणी पत्राद्वारे विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली आहे.
- हिरामण खोसकर, आमदार