डास प्रतिबंधक उपाययोजनांची मागणी
By Admin | Published: September 13, 2014 10:12 PM2014-09-13T22:12:38+5:302014-09-13T22:12:38+5:30
डास प्रतिबंधक उपाययोजनांची मागणी
नाशिक : वेगाने विस्तारणाऱ्या उपनगरांमध्ये ओसाड भूखंडांवर साचत चाललेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे डासांच्या संख्येत वाढ झाली असून, प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. ओसाड जागेवर साचलेल्या कचऱ्यामुळे आणि त्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे डबके निर्माण होत असून, डासांची पैदास वाढीस लागली आहे. त्यातून साथीचे रोग पसरण्याआधीच नाशिक महानगरपालिकेने प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाचे पाणी साचून त्यातही डासांची पैदास वाढण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. इंदिरानगर परिसरातील चेतनानगर, कलानगर, चर्चजवळील तसेच मागील परिसरात पाणी साचल्याने अनेक डबकी निर्माण झालेली दिसतात. त्यामुळे आरोग्यची धूरफवारणी यंत्राची गाडी आणि मलेरिया विभागाचे कर्मचारी परिसरात दिसतच नसल्याने महापालिका साथीचे रोग पसरण्याची वाट पाहत आहे काय, असा प्रश्न विचारला जातो आहे.