एकलहरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:01 AM2018-09-23T00:01:38+5:302018-09-23T00:02:12+5:30
परिसरातील लोकसंख्येचा विचार करून एकलहरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
एकलहरे : परिसरातील लोकसंख्येचा विचार करून एकलहरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. एकलहरे परिसरात सिद्धार्थनगर, हनुमाननगर, पहाडीबाबा झोपडपट्टी, देशमुखवाडी यासह एकलहरेगाव, गंगावाडी या परिसराचा समावेश असून सुमारे १५ ते २० इतकी लोकसंख्या आहे. यातील बहुतांश भाग हा झोपडपट्टी परिसरात विभागला आहे. विविध सुविधांचा अभाव, गरीब परिस्थिती, दुर्गंधी आदी कारणामुळे या भागात नेहमीच मोठ्या प्रमाणात विविध साथीच्या आजारांचा फैलाव होतो. रुग्णाची गंभीर परिस्थिती असल्यास नशिकरोड येथील मनपाच्या बिटको रुग्णालयात जावे लागते. एकलहरे परिसराच्या काही किलोमीटरच्याच अंतरावर सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, हिंगणवेढे व मळे परिसर असून, येथील रहिवाशांनादेखील हाच त्रास सहन करावा लागतो. एकलहरे व आजूबाजूच्या खेड्यांची परिस्थिती, लोकसंख्या लक्षात घेऊन एकलहरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.