कोरोनाची अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:41 PM2020-08-05T22:41:17+5:302020-08-06T01:34:42+5:30
देवळा : समाजमाध्यमातून देवळा नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाची बदनामी करणारी माहिती पसरविणाºया व्यक्तींविरोधात देवळा पोलीस ठाण्यात नगरपंचायतीच्या वतीने तक्रार देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लॉकडाऊननंतर चार महिने कोरोनामुक्त असलेल्या देवळा शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सोशल मीडियावर प्रत्येक रुग्णामागे नगरपंचायतीला दीड लाख रुपये मिळतात यासाठी हेतूपुरस्सर रुग्णांची संख्या वाढवली जात आहे. तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या नागरिकांना जबरदस्तीने कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे आदी जनतेची दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर पसरवण्याचा उद्योग काही अज्ञात व्यक्ती करीत असल्याची बाब समोर आली होती. यामुळे देवळा नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे आदींच्या शिष्टमंडळाने अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.