आंदोलनकर्त्यांना संरक्षण देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:19 AM2019-03-07T01:19:56+5:302019-03-07T01:24:38+5:30
कळवण : अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीविरोधात आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे करावी, असा निर्णय बैठकीत झाल्यानंतर याबाबत कळवणचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
कळवण : अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीविरोधात आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे करावी, असा निर्णय बैठकीत झाल्यानंतर याबाबत कळवणचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
दरम्यान कळवण तालुक्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन व मागणीसंदर्भात विचार करून शासनस्तरावरु न ११ मार्चपर्यंत सटाणा नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना रद्द करावी अन्यथा ११ मार्चपासून कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी , शेतकरी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, भेंडीचे माजी सरपंच विलास रौंदळ, रामदास देवरे, किसान सभेचे तालुका सरचिटणीस मोहन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामा पाटील यांच्या शिष्टमंडळाने सहायक जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांची भेट घेऊन निवदेन देऊन चर्चा केली. राज्य सरकारने आम्हाला आंदोलन करण्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.आजपासून काम सुरू होण्याची शक्यता सटाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला विरोध केला तर तुमच्या विरोधात गुन्हे दाखल करू, शेतात असलेली पिके तत्काळ काढा नाहीतर नासधूस करू, असा सज्जड दम पोलीस यंत्रणेने पुनंद प्रकल्प परिसरातील सुपले दिगर भागातील आदिवासी बांधवांना दिल्याने आदिवासी बांधव भयभीत झाले आहे. पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी संदर्भात पोलीस यंत्रणा, पाणीपुरवठा योजना विभाग यंत्रणेने बुधवारी पाहणी करून सुपले दिगर परिसरात शेतकरी बांधवांना सूचना केल्या. गुरुवार (दि.७) सकाळपासून जलवाहिनी कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आदिवासी बांधवांना विश्वासात न घेता कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी बांधवांचा असलेला विरोध पत्करून राज्य सरकार, पोलीस यंत्रणा धाकदडपशाही करून पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार असेल तर ते स्वप्न धुळीस मिळवू व आदिवासी जनतेला बरोबर घेऊन जनआंदोलन हाती घेऊ, असा इशारा देण्यात आला आहे.