वीरपत्नींना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:59 AM2018-12-11T00:59:01+5:302018-12-11T00:59:33+5:30
वीरपत्नींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाच्या माजी सैनिक महिला आघाडीने माजी सैनिक कल्याण अधिकारी रत्ना पारखी यांच्याकडे केली आहे.
नाशिक : वीरपत्नींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाच्या माजी सैनिक महिला आघाडीने माजी सैनिक कल्याण अधिकारी रत्ना पारखी यांच्याकडे केली आहे. श्रीमती पारखी या नुकत्याच रुजू झाल्या असून, त्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यात माजी सैनिकांच्या वीरपत्नी तथा माजी सैनिकांच्या महिलांचा विविध प्रश्नांविषयावर चर्चा करण्यात आली.
विशेषत: वीरपत्नी व माजी सैनिकांच्या महिलांचे जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करावा व जास्तीत जास्त बचत गट स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करावे, वीरपत्नी व माजी सैनिकांचा महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, शहीद जवानांचे कुटुंबीय व माजी सैनिकांची संख्या नाशिक शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने माजी सैनिक कल्याण अधिकारी यांची आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस तरी उपस्थित रहावे, अशी मागणी करण्यात आली. त्याप्रसंगी भाजपा माजी सैनिक महिला आघाडीचा जिल्हाध्यक्ष निर्मला पवार, रेखा खैरनार, सरला शिरसाठ, सुरेखा महाजन, कमल लहाने, सुषमा मोरे, किसनबाई बोडके, भारती पगारे, दीपाली बागुल, सुनीता पवार, सविता पवार, मीनाक्षी कडलग, तसेच देवळाली शहर महिला आघाडी अध्यक्ष शीतल पाटील उपस्थित होत्या.