मालेगावी कोरोना रुग्णांना सुविधा पुरविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:14 AM2021-04-20T04:14:55+5:302021-04-20T04:14:55+5:30
महाराष्ट्रभर कोरोना रुग्णांना सेवा-सुविधांअभावी जीव गमवावा लागत असल्या कारणाने प्रत्येक जिल्ह्यात युवा मोर्चातर्फे निवेदन देण्यात येत आहे. मालेगाव ...
महाराष्ट्रभर कोरोना रुग्णांना सेवा-सुविधांअभावी जीव गमवावा लागत असल्या कारणाने प्रत्येक जिल्ह्यात युवा मोर्चातर्फे निवेदन देण्यात येत आहे. मालेगाव शहरात कोरोनाने हाहाकार माजवला असून, रुग्णाचे रेमडेसिविर इंजेक्शन, बेड तसेच ऑक्सिजन वेळेवर मिळत नसल्यामुळे अतिशय हाल होत आहेत . अशा अनेक कारणामुळे काही रुग्ण दगावत सुद्धा आहेत. मात्र प्रशासन यामध्ये उपयोजना करण्यात कमी पडताना दिसत आहे. प्रशासनाने आपल्या कारभारात सुधारणा करून कोविड रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि बेडची सुविधा व्हावी यासाठी मालेगाव शहर व ग्रामीणच्या रुग्णांसाठी मोठ्या कोविड सेंटरची युद्ध पातळीवर उभारणी करावी. सध्या होत असलेला रेमडेसिविर व ऑक्सिजनचा तुटवडा पूर्ववत करावा, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांचा पाठपुरावा न झाल्यास या परिस्थितीतदेखील भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्याचा इशारा युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्याम गांगुर्डे, सरचिटणीस सुनील शेलार व आप्पा कुलथे यांनी यावेळी दिला.