ड्रेनेज लाइन टाकण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:39 AM2019-06-08T00:39:05+5:302019-06-08T00:39:21+5:30
हिरावाडी प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या जेम्स शाळे नजीकच्या हिरेनगर परिसरात ड्रेनेज लाइन नसल्याने गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले असून, शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्र ार प्रभागाच्या नगरसेवक पूनम मोगरे यांनी महापालिका प्रशासनाकडे पत्रकान्वये केली आहे.
पंचवटी : हिरावाडी प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या जेम्स शाळे नजीकच्या हिरेनगर परिसरात ड्रेनेज लाइन नसल्याने गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले असून, शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्र ार प्रभागाच्या नगरसेवक पूनम मोगरे यांनी महापालिका प्रशासनाकडे पत्रकान्वये केली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी परिसरात ड्रेनेज लाइन टाकण्याच्या कामाच्या निविदा निघालेल्या होत्या, मात्र त्यानंतरदेखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे तर काही ठिकाणी दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे तळे साचले डासांचा प्रादुर्भावदेखील वाढलेला आहे. परिसरात ड्रेनेजलाइन नसल्याने सांडपाणी वाहून जाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने पाणी साचून राहत आहे. आगामी कालावधीत पावसाळा असल्याने परिसरात ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून
आजार उद्भवण्याची दाट शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या भागात ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम हाती घेणे गरजेचे आहे.
हिरेनगर भागात ड्रेनेज लाइन टाकली नसल्याने महापालिका संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन ड्रेनेज लाइन टाकावी,
अशी मागणी वारंवार संबंधित विभागाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मोगरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.