पतीसह सासूकडे चाळीस लाखांची खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 05:48 PM2018-09-16T17:48:24+5:302018-09-16T17:49:16+5:30

नाशिक : पतीसह सासूचा छळ करून ४० लाख रुपयांची मागणी करणारी सून स्वाती प्रवीण गांगुर्डे तिचा भाऊ सागर पगारे, आई उषा हिरामण पगारे, विशाखा पगारे (रा़आदर्शनगर, साक्री, धुळे) व टिटवाळा येथील वकील अ‍ॅड़ पंकज राजबली मनोहर (रा़ बद्री पॅलेस, टिटवाळा, ठाणे) यांच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याता आला आहे़ सुनेच्या त्रासामुळेच सासूचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप करून प्रवीण गांगुर्डे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आईचा मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेतली होती़ दरम्यान, या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनीही पैसे मागितल्याने त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे़

Demand for ransom of 40 lakhs with husband and mother-in-law | पतीसह सासूकडे चाळीस लाखांची खंडणीची मागणी

पतीसह सासूकडे चाळीस लाखांची खंडणीची मागणी

Next
ठळक मुद्देसासूचा हृदयविकाराने मृत्यू : सुनेसह, नातेवाईक व वकिलावर गुन्हा दाखल

नाशिक : पतीसह सासूचा छळ करून ४० लाख रुपयांची मागणी करणारी सून स्वाती प्रवीण गांगुर्डे तिचा भाऊ सागर पगारे, आई उषा पगारे, विशाखा पगारे (रा़आदर्शनगर, साक्री, धुळे) व टिटवाळा येथील वकील पंकज राजबली मनोहर (रा़ बद्री पॅलेस, टिटवाळा, ठाणे) यांच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याता आला आहे़ सुनेच्या त्रासामुळेच सासूचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप करून प्रवीण गांगुर्डे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आईचा मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेतली होती़ दरम्यान, या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनीही पैसे मागितल्याने त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे़

दिंडोरीरोडवरील पोकार कॉलनीतील गणेश अपार्टमेंटमधील प्रवीण गांगुर्डे यांचा चार वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री येथील राणी उर्फ स्वाती भीमराव पगारेसोबत झाला होता. लग्नानंतर त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याने त्यांनी काही महिन्यांनी न्यायालयातून घटस्फोट घेतला़ यादरम्यान, सून राणी हिने पतीसह सासरच्यांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळाची फिर्याद दाखल केली. त्यानुसार पती प्रवीण गांगुर्डे याच्यासह त्याच्या भावावर व आईवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात म्हसरूळ पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. दरम्यान, अनेक महिन्यांपासून पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या वा-या कराव्या लागल्याने गांगुर्डे कुटुंबीय जेरीस आले होते.

११ सप्टेंबर रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गांगुर्डे कुटुंबाला न्यायालयाने जामीन मंजूर केला; मात्र राणी हिने संशयित गांगुर्डे यांना जामीन मंजूर झाल्याबाबत न्यायालयात अपील दाखल केले. त्यामुळे गांगुर्डे कुटुंबीयांना पुन्हा न्यायालयात यावे लागले. यातच शुक्रवारी (दि़१४) राणी, तिची आई, भाऊ व वकिलाने पती प्रवीण गांगुर्डे व सासूकडे गुन्हा मागे घ्यायचा असेल तर चाळीस लाख रुपयांची मागणी केली़ तसेच पैसे न दिल्यास तुम्हा सगळ्यांना बसवून ठेवते, तुमच्या पूर्ण खानदानाची वाट लावते, असा दम दिला़ या छळामुळे सासू लीलाबाई खचल्या होत्या. त्यांना शुक्रवारी (दि. १४) रात्री हृदयविकाराचा झटका आला व मृत्यू झाला़

याप्रकरणी प्रवीण गांगुर्डे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, खंडणीसह शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Demand for ransom of 40 lakhs with husband and mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.