मिठाई विक्रेत्याकडून खंडणीची मागणी

By admin | Published: June 23, 2017 05:09 PM2017-06-23T17:09:39+5:302017-06-23T17:09:39+5:30

गंगापूर रोडवरील मिठाई विक्रेत्यास अन्न व औषध विभागातून बोलत असल्याचे सांगून एका संशयिताने तुमच्याविरोधात तक्रार आली असून, ती मिटविण्यासाठी खंडणीची मागणी केल्याचे समोर आले आहे़

The demand for ransom from the sweet seller | मिठाई विक्रेत्याकडून खंडणीची मागणी

मिठाई विक्रेत्याकडून खंडणीची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गंगापूर रोडवरील मिठाई विक्रेत्यास अन्न व औषध विभागातून बोलत असल्याचे सांगून एका संशयिताने तुमच्याविरोधात तक्रार आली असून, ती मिटविण्यासाठी खंडणीची मागणी केल्याचे समोर आले आहे़
गंगापूर रोडवरील मिठाई विक्रेते सूरज काळे यांना संशयित सूरज सुरेश काळे (रा़ सोलापूर) याने मोबाइलवर कॉल केला़ वान्द्रे येथील अन्न व औषध विभागातून बोलत असल्याचे सांगून आपल्याविरुद्ध मंत्रालयाकडून तक्रार आली असून, ती मिटविण्यासाठी सर्वप्रथम ५० हजार रुपयांची मागणी केली़ यानंतर चौधरी यांच्या भावासोबत फोनवर बोलून तक्रार मिटविण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली़
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सोलापूर येथील संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: The demand for ransom from the sweet seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.