भूखंडाचा मोबदला वसूल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 08:16 PM2020-07-25T20:16:39+5:302020-07-26T00:03:37+5:30
नाशिक : त्र्यंबकरोडवरील वादग्रस्त भूखंड प्रकरणात अदा केलेला मोबदला तातडीने वसूल करण्याची मागणी भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात महासभेचा ठरावदेखील करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

त्र्यंबकरोडवरील पोलीस अकादमीसमोर असलेल्या सर्व्हे नंबर ७५०, ७५१ व ७५५ या भूखंडावरील वाद गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत गाजत आहे. या भूखंडावर सुमारे नऊ आरक्षणे असून, त्यामुळे २५ हेक्टर जागा महापालिकेला मिळणे आवश्यक
होते.
किंबहूना नागरी कमाल जमीन धारणा कायद्यानुुसार ही जागा महापालिकेला मोफत मिळणार आहे. मात्र, त्यानंतरदेखील जागा मालकांनी महापालिकेकडे मोबदल्याची मागणी केली. त्यातील काही मोबदला देण्यात आला असून, संबंधितांनी टीडीआर स्वरूपात मोबदला मागितल्यानंतर या वादाला सुरुवात झाली.
सदरच्या प्रकरणात महासभेतदेखील जागा मालकाला दिलेला मोबदला वसूल करून भूखंडावर नाव लावण्याचा ठराव करण्यात आला आहे, त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.