मनरेगा योजनेची नोंदणी करुन जाॅबकार्ड देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:03+5:302021-09-15T04:18:03+5:30

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीमुळे शहरातील अनेकांचा रोजगार व्यवसाय हिरावला गेला असल्याने केंद्र व राज्य सरकार मनरेगा अर्थात एमआरइजीएस ...

Demand for registration of MGNREGA scheme and issuance of job card | मनरेगा योजनेची नोंदणी करुन जाॅबकार्ड देण्याची मागणी

मनरेगा योजनेची नोंदणी करुन जाॅबकार्ड देण्याची मागणी

Next

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीमुळे शहरातील अनेकांचा रोजगार व्यवसाय हिरावला गेला असल्याने केंद्र व राज्य सरकार मनरेगा अर्थात एमआरइजीएस अंतर्गत नोंदणी करुन सर्वांना तत्काळ जॉबकार्ड उपलब्ध करुन देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांनी केली आहे. याबाबत त्र्यंबकेश्वर शहरातील बेरोजगार महिला पुरुष आदींच्या उपस्थितीत तहसीलदार दीपक गिरासे व त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या वतीने शहर अभियंता अभिजित इनामदार तसेच कार्यालयीन अधीक्षक पायल महालेयांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, देशात व राज्यात कोविड-१९ केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या आदेशानुसार सर्वत्र लाॅकडाऊन जारी केल्याने अनेक निर्बंध लादले गेले. त्र्यंबक नगरपरिषदेने गेल्या दोन वर्षापासून वेळोवेळी लाॅकडाऊन केल्यामुळे शहरातील सर्व छोटे मोठे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहे. हातावर पोट भरणाऱ्यांची अक्षरशः उपासमार होऊ लागली. सातत्याने होणारे लाॅकडाऊन व जनता कर्फ्यू यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मोलमजुरी करुन आपली उपजीविका करणारी गोरगरीब जनता हवालदिल झाली आहे. मंदिर खुले असताना मंदिर परिसरात फुले विक्री करुन उपजीविका करणाऱ्यांचे व्यवसाय मंदिर बंद असल्याने फुुल विक्री बंद पडली. त्यामुळे शहरातील लोकांच्या रोजगारांसाठी तत्काळ मनरेगा योजने अंतर्गत नोंदणी करुन जाॅब कार्ड तयार करून सर्वांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, मोहन सोनवणे, कृष्णा काशीद, अनिल गांगुर्डे , अंकुश सोनवणे,संगीता भांगरे,मंगल गुंबाडे,पुष्पा झोले,कमल वाघ,आशा गमे,अर्चना झोले,माधुरी हनुमंते,अनिता बदादे चंद्रभागा वाघ,अलका पोंटीदे सोनाली बदादे,सविता कोरडे,शिला भांगरे,सुशीला भांगरे,मिना दिवे,कमल रोकडे उपस्थित होते. (१४ टीबीके १)

140921\14nsk_18_14092021_13.jpg

१४ टीबीके १

Web Title: Demand for registration of MGNREGA scheme and issuance of job card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.