पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:16+5:302021-06-02T04:12:16+5:30
चांदवड : शहरात गेल्या १० ते १२ दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. तो नियमित व्हावा, शहरातील बंद वॉटर एटीएम ...
चांदवड : शहरात गेल्या १० ते १२ दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. तो नियमित व्हावा, शहरातील बंद वॉटर एटीएम तत्काळ सुरू करावे, पावसाळ्याच्या पूर्वी अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या व गटारीचे काम पूर्ण करावे यासह इतर मागण्यांचे निवेदन शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्य अधिकारी अभिजित कदम यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात जिल्हा सरचिटणीस अंकुर कासलीवाल, भाजपा शहर अध्यक्ष मुकेश आहेर, महेंद्र कर्डिले, महेश बोराडे, नीलेश काळे, किशोर क्षत्रिय, शिवाजी गवळी, उदय वायकोळे, वसीम कादरी आदीसह कार्यकर्त्यांचा समावेश होता. निवेदनात शहरात पाणी टंचाई व इतर अडचणींना जनतेला ऐन कोरोना काळात सामोरे जावे लागत आहे. शहरात अनेक समस्या प्रलंबित असून त्याकडे उघडउघड डोळेझाक होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्मशानभूमीत कोविड रुग्णांचा अंत्यविधी होत असल्याने अंत्यविधी झाल्यानंतर योग्य ती फवारणी करण्यात यावी, पाणी साचत असलेल्या ठिकाणी तत्काळ मुरूम राखण्यात यावे. तरी या सर्व मागण्यांची दखल घेऊन जनतेच्या हिताच्या मागण्या पूर्ण कराव्यात. कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे व गांधीगिरी आंदोलन केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.
------------------------------------------------------
01 एम.एम.जी.1- - चांदवड शहरातील विविध समस्यांबाबत मुख्य अधिकारी अभिजित कदम यांना निवेदन देताना अंकुर कासलीवाल, मुकेश आहेर, किशोर क्षत्रिय, महेश बोराडे, नीलेश काळे, महेंद्र कर्डिले आदी.
===Photopath===
010621\01nsk_9_01062021_13.jpg
===Caption===
०१एमएमजी १