ॅपिंपळगाव- संगमनेर बस पांगरीमार्गे पूर्ववत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:54 PM2019-05-29T18:54:31+5:302019-05-29T18:54:48+5:30
पांगरी: पिंपळगाव-संगमनेर ही बस पांगरी मार्गे पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
पांगरी: पिंपळगाव-संगमनेर ही बस पांगरी मार्गे पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. पिंपळगाव-संगमनेर ही निफाड-पांगरी- नांदूरशिंगोटे मार्गे जाणारी बस फेरी सुमारे एक महिन्यापासून बंद करण्यात आली आहे. सदर बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
पिंपळगाव आगाराने प्रवाश्यांच्या मागणीनुसार निफाड, खेडलेझुंगे, सोमठाणे, पंचाळे, पांगरी, मºहळ, नांदूरशिंगोटे मार्गे संगमनेर अशी बससेवा सुरु केली होती. प्रवांशाना माहिती नसल्याने या बसला सुरवातीस कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, नंतर प्रवाशांची संख्या वाढत असतानाच सदरची बस पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होत आहे.