यंत्रमाग कारखानदारांना शिथिलता देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:29+5:302021-03-10T04:15:29+5:30
सध्या राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे निर्बंध लावले जात आहेत. मात्र सध्या मालेगाव शहरात ...
सध्या राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे निर्बंध लावले जात आहेत. मात्र सध्या मालेगाव शहरात कोविड रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याचा दावा करत निवेदनात म्हटले आहे, मार्च महिन्याअखेर मुस्लीम धर्मीयांच्या शब-ए-बरात व एप्रिल महिन्यामध्ये पवित्र रमजान महिन्याचे आगमन होत आहे. यापूर्वी १० ते ११ महिन्यांपासून छोटे -मोठे व्यवसाय करणारे, पावरलूम मजुरांसह इतर नागरिक कोरोनाच्या कठोर नियमांमुळे त्रस्त झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून परिस्थिती पूर्वपदावर येऊन स्थिती सुधारत होती. मात्र नवीन नियमांमुळे आर्थिक स्थिती परत बिघडण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत शहरात निर्बंध लावणे हे उचित वाटत नाही. मालेगाव शहराची सध्याची परिस्थिती पाहता सर्वांना सोयीस्कर होईल, असे निर्बंध लावावेत व नियमांचा फेरविचार करावा, अशी मागणी माजी आमदार शेख यांनी निवेदनात केली आहे.