चणकापूरमधून पाणी सोडण्याची मागणी

By admin | Published: March 6, 2017 12:52 AM2017-03-06T00:52:56+5:302017-03-06T00:53:06+5:30

अभोणा : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चणकापुर धरणाचे पाणी धरणाखालील परिसरात पिण्याच्या पाण्या बरोबर शेतीसाठी हि मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडुन व्यक्त केली जात आहे.

Demand for release of water from Chandrapur | चणकापूरमधून पाणी सोडण्याची मागणी

चणकापूरमधून पाणी सोडण्याची मागणी

Next

अभोणा : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चणकापुर धरणाचे पाणी धरणाखालील परिसरात पिण्याच्या पाण्या बरोबर शेतीसाठी हि मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडुन व्यक्त केली जात आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाल्याने परिसरातील तलाव, धरण तुडुंब भरले होते.पण ऐन शेतातील पिके पक्वतेवर आले असता विहीरींनी तळ गाठल्याने पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. नदी पात्रात पाणी सोडण्यात आले परंतु पाटाला पाणी न सोडल्याने पाटालगतच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कांदा गहू ही पिके हातची जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
धरण उशाला अन कोरड
घशाला अशी येथील आदिवासी शेतकऱ्यांची परिस्थती झाली आहे. या बाबत जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून प्रथम रोटेशन चणकापुर कालव्याचे आवर्तन सोडण्याची मागणी कळवण तालुक्यातील अभोणा परिसरातून
होत आहे. विहीरीनी तळ गाठला
परंतु एका आवर्तनामुळे चालू पीक हाती येतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)

Web Title: Demand for release of water from Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.