वार्शी धरणातून खर्डेसाठी पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:35+5:302021-06-25T04:12:35+5:30
निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील वार्शी धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यातून सन २००५ पासून आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. या ...
निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील वार्शी धरणातून काढण्यात आलेल्या कालव्यातून सन २००५ पासून आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. या कालव्याला पाणी सोडावे याकरिता वारंवार पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप पावेतो याची दखल घेतली गेलेली नाही. वार्शी धरणातून खर्डे येथील शेतकऱ्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे, मात्र गाव या कालव्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने संबधित विभागावर लाभार्थी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खर्डे गाव हे अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने विहिरींनी तळ गाठला होता. शेतकऱ्यांचे पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्याने सिंचनासाठी आता कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, सुनंदा ठोंबरे, येवाजी गांगुर्डे, दौलत गांगुर्डे, भाऊसाहेब गांगुर्डे, भिका सोनवणे, उत्तम सोनवणे, माधव ठोंबरे, नंदू देवरे, आनंदा सोनवणे, दादाजी गांगुर्डे, अण्णा गवारे, जिभाऊ गांगुर्डे, आबा गांगुर्डे, विजय गांगुर्डे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - २४ वार्शी डॅम
वार्शी धरणातून खर्डे गावासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, या मागणीचे मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रहारचे भाऊसाहेब मोरे, बापू देवरे, माधव ठोंबरे, आबा गांगुर्डे, विजय गांगुर्डे आदी.