नगरसेवकाचा नामफलक काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:11 AM2020-12-08T04:11:54+5:302020-12-08T04:11:54+5:30
प्रभाग ९चे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा लावण्यात आला आहे. सदरचा फलक सर्वसामान्य फलकांपेक्षा आकाराने मोठा ...
प्रभाग ९चे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा लावण्यात आला आहे. सदरचा फलक सर्वसामान्य फलकांपेक्षा आकाराने मोठा असल्याने साहजिकच येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधले जात आहे. छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी या फलकावर आक्षेप घेतला आहे. शहरात ठिकठिकाणी असलेले अतिक्रमण आणि शहर विद्रुपीकरणास कारणीभूत असलेले होर्डिंग काढताना मनपा प्रशासन सापत्न भावाचा अवलंब करीत असल्याचा आरोप केला आहे. नियम भंग करून अशा पद्धतीने अतिक्रमण करणे महापालिका अधिनियमात बसते का? असा सवाल करून अशा लोकप्रतिनिधींवर निलंबनाची कारवाई करण्याचे धाडस मनपा प्रशासनाने दाखवावे व सदरचा नियमबाह्य फलक काढावा, अशी मागणी करण गायकर यांनी केली आहे. (फोटो ०७ फलक)