वाळलेली झाडे काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:03 PM2018-11-18T22:03:49+5:302018-11-19T00:45:30+5:30
गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंतची वाळलेली झाडे महानगरपालिकेने त्वरित काढावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
मालेगाव कॅम्प : इतर राज्यात अवकाळी वादळांना सुरूवात झाली. मनुष्यही नैसर्गिक हानी झाली व करोडो रूपयांचे नकुसान झाले आहे. तशी अवस्था मालेगाव शहरामध्ये होवू नये म्हणून गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंतची वाळलेली झाडे महानगरपालिकेने त्वरित काढावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंत झाडे नुसती वाळलेली नाहीत तर ते पडण्याच्या मार्गावर आहेत व विजेच्या तारा त्याला खेटून आहेत. काही झाडे त्यांच्या वजनाने वाकलेली आहे व ते केव्हा पडतील हे सांगता येत नाही. रस्त्याची दुतर्फा वाहतूक चालते.
हा रस्ता ताहाराबाद ते टेहरे मार्गे नाशिक जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे ह्या ठिकाणी केव्हा अपघात होईल ते सांगता येत नाही. झाडे आज वाळलेली आहेत तर ते कापूण ुढची जीवितहानी टाळता येईल. वादळापूर्वीची शांतता म्हणता येणार नाही. ही झाडे केव्हाही उन्मळून पडण्याची शक्यता आहे. तिच झाडे नसून शहरामध्ये अशी बरीचशी झाडे आपल्याला पहायला मिळतील. मोची कॉर्नर ते मोसमपूल या रस्त्यालगत सुद्धा झाडे अशी भरपूर आहेत . जीवितहानी होणार नाही त्याच्या आधी ही झाडे त्वरित काढून शहरवासियांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.