सरपंच्याचा कार्यकाल संपताच पत्र्याचे शेड काढण्याचीमागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:46 PM2020-08-05T17:46:07+5:302020-08-05T17:46:55+5:30

पिंपळगाव बसवंत-निफाड औरंगाबाद महामार्गाच्या कडेला नैताळे गावात सरपंचांचा कार्यकाळ संपण्याच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी तयार केलेले लोखंडी पत्र्याचे अनिधकृत शेड काढावे असे निवेदन सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग नाशिक, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व निफाड तहसील विभागाला देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Demand for removal of leaf shed at the end of Sarpanch's tenure | सरपंच्याचा कार्यकाल संपताच पत्र्याचे शेड काढण्याचीमागणी

सरपंच्याचा कार्यकाल संपताच पत्र्याचे शेड काढण्याचीमागणी

googlenewsNext
ठळक मुद्देमहामार्ग अन् गावचे मुख्यप्रवेशद्वार बंद करण्याचा ग्रामस्थांचा विचार

पिंपळगाव बसवंत-निफाड औरंगाबाद महामार्गाच्या कडेला नैताळे गावात सरपंचांचा कार्यकाळ संपण्याच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी तयार केलेले लोखंडी पत्र्याचे अनिधकृत शेड काढावे असे निवेदन सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग नाशिक, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व निफाड तहसील विभागाला देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नैताळे गावाच्या निफाड औरंगाबाद महामार्गाच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अपघाती क्षेत्रात अज्ञात दहा इसमानी रविवारी (दि. २ जुलै) लोखंडी शेड तयार करून अनिधकृत अतिक्र मण केले असल्याने निफाड औरंगाबाद महामार्गाच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी त्या परिसरात भविष्यात अपघात होऊन गावाच्या शांतता सुव्यवस्थाला धोका निर्माण होणार असल्याने त्या ठिकाणचे अनिधकृत अतिक्र मण त्वरित काढावे व गावाची शांतता सुव्यवस्था ठिकवावी असे निवेदन ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग, जिल्हा अधिकारी,गटविकास अधिकारी व निफाड तहसीलदार कार्यालयात दिले आहे.

गावातील काही अज्ञात व्यक्तींनी महामार्गाच्या अपघाती क्षेत्रात अनिधकृत लोखंडी पत्र्याचे शेड उभारले आहे ते ग्रामपंचायत हद्दीत नसल्याने ग्रामपंचायत कारवाई करू शकत नसल्याने याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाला कळविले आहे.
- डी. एम. ढुकळे, ग्रामसेवक, नैताळे.

गावातील सत्ताधारी गटाचा कार्यकाल संपल्यावर गावातील अज्ञात इसमानी निफाड औरंगाबाद महामार्गावर रातोरात धोकेदायक अनधिकृत लोखंडी पत्र्याच्या दहा शेड उभारल्या, परंतु ते बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याने ग्रामपंचायत कारवाई करू शकत नाही. पण गावाच्या सुरक्षितता व शांततेसाठी ग्रामविकास अधिकारी व आम्ही संबंधित भागाला कळवून परिस्थिती लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हे धोकेदायक अनिधकृत पत्र्याच्या शेडचे बांधकाम काढावे.
- संजय बुरगुडे, माजी सरपंच, नैताळे.

अज्ञात इसमानी अनिधकृत पत्र्याचे बांधकाम महामार्गाच्या अपघाती क्षेत्रात उभारणी केले आहे. परीणामी गावात वाद होत आहे. गावाची सुरक्षितता व शांतता भंग होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी ही विनंती.
- एन. डी. बुरगुडे, सामाजिक कार्यकर्ते.
 

Web Title: Demand for removal of leaf shed at the end of Sarpanch's tenure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.