धरणातील गाळ काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:02 AM2019-06-12T01:02:47+5:302019-06-12T01:04:31+5:30

सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला नांदूरमधमेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जात असून, या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. हा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी लासलगाव शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Demand for removal of mud | धरणातील गाळ काढण्याची मागणी

धरणातील गाळ काढण्याची मागणी

Next

लासलगाव/सायखेडा : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला नांदूरमधमेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जात असून, या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. हा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी लासलगाव शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्याचे वनमंत्री मुनगंटीवार सोमवारी एका कार्यक्रमानिमित्त नाशिक येथे आले असता लासलगावसह ४२ गाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने ही क्षमता केवळ २५० दशलक्ष फूट राहिली आहे. परिणामी या योजनेसाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने बंधाºयातील गाळ तातडीने काढण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Demand for removal of mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.