नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 04:15 PM2019-12-24T16:15:52+5:302019-12-24T16:16:19+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत असलेल्या मानोरी बुद्रुक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नाशिक-येवला महामार्गाला मिळणाऱ्या मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक आणि मुखेड फाटा ते पिंपळगाव लेप, जऊळके या रस्त्यावर अवजड वाहतुकीने स्त्याची दुरवस्था झाली आहे.
मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत असलेल्या मानोरी बुद्रुक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नाशिक-येवला महामार्गाला मिळणाऱ्या मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक आणि मुखेड फाटा ते पिंपळगाव लेप, जऊळके या रस्त्यावर अवजड वाहतुकीने स्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मानोरी ते खडकीमाळ रस्त्याची तसेच मानोरी-मुखेड रस्त्याचीदेखील दुरवस्था झाली आहे. अनेकदा या रस्त्याने प्रवास करताना चार चाकी वाहनांचे पाटे तुटणे, नट बोल्ट गळून पडणे, वाहनांमध्ये बिघाड होणे असे प्रकार या रस्त्यावर वारंवार घडत आहेत. तसेच खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मणक्याचे, पाठीचे आजारदेखील उद्भवले असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. येवला येथील तालुकास्तरीय कामकाज, कांदा बाजार आदी शासकीय कामासाठी येवल्याला जाण्यासाठी तसेच मुखेड फाट्याला जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी झुडपांनी साइडपट्ट्या व्यापल्या असल्याने दोन मोठ्या वाहनांना शेजारून जाताना अडथळा निर्माण होत आहे.
वाहनांचे पांढरे एलइडी बल्ब धोकादायक
ग्रामीण भागात मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांना बाजारात पांढरे एलईडी बल्ब बेकायदेशीरपणे स्वस्तात बसवून मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वाहनचालक आपल्या वाहनाचा मुख्य बल्ब न वापरता पांढरा एलइडी बल्ब वापरत आहेत. ग्रामीण भागात रस्त्याच्या अरु ंद स्थितीमुळे अपघातात नेहमी वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना समोरून पांढरा एलईडी बल्बचा तीव्र प्रकाश वाहन चालकाच्या डोळ्यावर पडत असल्याने दुसºया वाहनचालकाला वाहन बाजूला घेण्यासाठी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालक थेट काटेरी झुडपात जाऊन पडतो. या पांढºया एलईडी बल्ब वाहन चालकांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.
रस्तांच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपांचा विळखा.
येथील परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. रस्ते अरु ंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंसह मोठ्या प्रमानात काटेरी झुडपे झाली आहे. साइडपट्ट्या काटेरी झुडपांनी व्यापल्या असल्याने दोन चार चाकी वाहने शेजारून जाताना मोठी कसरत करावी लागते.