गिरणा धरणाच्या कालव्यांसह पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:46+5:302021-05-29T04:12:46+5:30
नांदगाव : तालुक्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या गिरणा धरणाच्या कालव्यांसह पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने गळती होऊन ...
नांदगाव : तालुक्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या गिरणा धरणाच्या कालव्यांसह पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने गळती होऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. सदर दुरुस्तीकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
सन १९५५ मध्ये धरण बांधकामासाठी कुदळ मारली गेली. या पायाभरणी समारंभाला पंतप्रधान पंडित नेहरू यांनी हजेरी लावली होती. १४ वर्ष सलग काम झाल्यावर १९६९ मध्ये धरणाचे लोकार्पण झाले. गिरणा प्रकल्प नांदगाव तालुक्यात असला तरी सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. त्याचा बांधकाम खर्च १३ कोटी रुपये झाला होता. गिरणा धरणापासून निघालेला डावा पांझण कालवा ५३ कि.मी. लांबीचा, उजवा जामदा २० कि.मी.चा, डावा जामदा ४० कि.मी. तर चातर निम्न गिरणा काठ कालवा ६० कि.मी. लांबीचा आहे. या कालव्यांमुळे गिरणा खोऱ्याला सुपीकता व समृद्धता लाभली आहे. तथापि कालव्यांपासून होणारी गळती, पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज हे प्रश्न सोडविणे गरजेचे बनले आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. याकडे गिरणा पाटबंधारे विभागाचे सतत दुर्लक्ष होत असते. गिरणा धरणातून मालेगाव शहर, नांदगावसह ५६ खेडी अशा एकूण १२७ पाणीपुरवठा योजना आहेत. जळगाव जिल्ह्याच्या सुमारे ७५ टक्के लोकसंख्येची यावर तहान भागते. सदर धरणाच्या कालव्यासह पाटचाऱ्यांची तातडीने दुरूस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.
फोटो- २८ गिरणा डॅम
सन १९५५ मध्ये गिरणा धरणाच्या पायाभरणी समारंभप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. (संग्रहित छायाचित्र माजी आमदार अनिल अहेर यांच्या सौजन्याने)
===Photopath===
280521\28nsk_37_28052021_13.jpg
===Caption===
फोटो- २८ गिरणा डॅमसन १९५५ मध्ये गिरणा धरणाच्या पाया भरणी समारंभप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. (संग्रहित छायाचित्र माजी आमदार अनिल अहेर यांच्या सौजन्याने)