राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या दुुरूस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 02:07 PM2020-08-28T14:07:59+5:302020-08-28T14:08:24+5:30
पिंपळगाव बसवंत : उंबरखेड चौफुली ते वनी चौफुली परिसरातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूंना असलेल्या सर्विस रोडची दुरवस्था झाली आहे.
पिंपळगाव बसवंत : उंबरखेड चौफुली ते वनी चौफुली परिसरातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूंना असलेल्या सर्विस रोडची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्यात रस्ता की,खड्डा अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून तातडीने सर्व्हिस रस्ता दुरुस्त करून वाहन धारकांना दिलासा द्यावा अन्यथा टोल नाक्यावर आंदोलन करून प्लाझा बंद करू असा इशारा पिंपळगाव शहर भाजपाच्यावतीने पीएनजी पिंपळगाव टोल प्लाझाच्या व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपळगाव शहरातुन जाणाऱ्या मुंबई आग्रा रोडवरील उंबरखेड चौफुली ते वनी चौफुली पर्यंत सर्व्हिस रोडवर बहुतांश ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांचे छोटे-मोठे अपघात दिवसेंदिवस होत आहे. वाहनांचे त्यात नुकसान होऊन वाहनधारक देखील जखमी होत आहे. सर्विस रोडवरील दोन्ही बाजूला असणाºया पावसाच्या पाण्याचा योग्य नसल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. त्याचा योग्य निचरा करावा, उड्डाणपुलाच्या खाली उभारलेल्या बोगद्यातील लाईट बंद असल्याने त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय टोल नाक्यावरील कमर्चारी स्थानिक नागरिकांशी उद्धटपणे वागत दमबाजी करीत असल्याचेही त्यांनाही समजावून सौजन्याने वर्तन करण्यास सांगावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सतीश मोरे , अल्पेश पारख,भाजप प्रशांत घोडके ,दत्तू काळे,शितल बुरकुले, भाऊसाहेब खैरनार ,चेतन मोरे ,योगेश लावर, लखन शिंदे,मोहन शेख ,संदीप झुटे उपस्थित होते