वैतरणा परिसरातील खराब वीज खांब बदलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:29 PM2020-07-04T17:29:11+5:302020-07-04T17:30:00+5:30
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरातील बहुतांशी विज वाहक खांब जीर्ण झालेले असुन मोडकळीस आले आहे. तरी देखील विज वितरण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने विज वितरण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरातील बहुतांशी विज वाहक खांब जीर्ण झालेले असुन मोडकळीस आले आहे. तरी देखील विज वितरण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने विज वितरण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
वैतरणा परिसरात विज निर्मिती प्रकल्प असुन विज वितरण विभागाची ३३ के व्ही व ११ केव्ही विधुत वाहक स्वतंत्र्य लाईन गेलेल्या आहेत. या लाईन शेतकर्यांच्या शेता शेतातुन गेलेल्या असुन अक्षरशा खाब जिर्ण होऊन मोडकळीस आले आहे. यामुळे विधुत वाहक तारा खाली लोंबलेल्या असुन पावसाळ्यातील सोसाट्याच्या वार्यामध्ये कोणत्याही क्षणी पडु शकतात त्यामुळे विज वितरण विभागाने मोडकळीस आलेले खांब बदलने आवश्यक आहे. मात्र सुस्त असलेले विज वितरण विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असते. पावसाळ्यामध्ये विज पुरवठा खंडीत झाल्यानंतरच यांचे कर्मचारी या परिसरात फिरताना दिसता अन्यथा यांच्या अधिकार्यांचे व कर्मचार्यांचे दर्शनही दुर्मिळच असते.
पावसाळ्यामध्ये घरोघरी विजेच्या मोठ्या प्रमाणात आवश्यकता असता. मात्र विज वितरण विभाग उन्हाळा व हिवाळा कार्यालयात बसुन विज बिलांचे नियोजन करत असताता आण िपावसाळ्यापुर्वी अपेक्षति असणाऱ्या कामाकडे दुर्लक्ष करून विज पुरवठा खंडीत झाल्यानंतर काम करायचे याची वाट बघत असतात.
विज वितरण विभागाने नुकतेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अव्वाचे सव्वा बिले देऊन सर्वसामान्याना हैराण केले आहे. पावसाळ्यात विज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी तरी उपाययोजना करावी अशी मागणी नागरीक करत आहे.
माङया शेतामधुनच ११ केव्ही ची विज वितरण विभागाची मेन लाईन गेलेली असुन माझ्या शेतात असणाºया विज वितरण विभागाचा विधुत वाहक खांब पुर्णपणे जिर्ण झालेला असुन मोडकळीस आलेला आहे. कोणत्याही क्षणी येथील खांब कोसळु शकतो या खांबाला बदलने गरजेचे असुन या खांबा जवळ माझे घर असल्याने आमच्या जिवीतास यापासुन धोका आहे.
- विश्वनाथ खातळे
शेतकरी, ओंडली.