जिल्ह्यातील वनमजुरांना सेवेत कायम करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:25+5:302021-06-30T04:10:25+5:30
पेठ : वर्षानुवर्ष तुटपुंज्या रोजंदारीवर वनसंरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वन विभाग व वन विकास महामंडळातील रोजंदारी वनमजुरांना कायम ...
पेठ : वर्षानुवर्ष तुटपुंज्या रोजंदारीवर वनसंरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वन विभाग व वन विकास महामंडळातील रोजंदारी वनमजुरांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणीसाठी भारतीय वन कामगार सेनेच्या वतीने जिल्ह्यातील आमदारांना साकडे घालण्यात आले आहे.
सोमवारी वनकामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आ. हिरामण खोसकर यांची भेट घेऊन आगामी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील उर्वरित वनमजुरांना कायम करण्याच्या प्रलंबित मागणीबाबत मुद्दा उपस्थित करून रोजंदारी वनमजुरांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट आहिरे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, रवींद्र गांगुर्ड, राजाराम सूर्यवंशी, अनाजी आवारे, वसंत दुगल, धर्मराज भवरे, सीताराम कोठरे यांच्यासह वनकामगार उपस्थित होते.
---------------------------
भारतीय वन कामगार सेनेच्या वतीने आ. हिरामण खोसकर यांना निवेदन देताना पोपट आहिरे, भाऊसाहेब शिंदे, रवींद्र गांगुर्ड, राजाराम सूर्यवंशी, अनाजी आवारे, वसंत दुगल, धर्मराज भवरे, सीताराम कोठरे आदी. (२९ पेठ १)
===Photopath===
290621\29nsk_4_29062021_13.jpg
===Caption===
२९ पेठ १