आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:02 PM2020-07-21T22:02:08+5:302020-07-22T00:57:55+5:30
पेठ : सध्या राज्यभर कोविड-१९ साथरोगाने थैमान घातले असून, या बिकट आणि धोकेदायक परिस्थितीत रोजंदारीवर काम करणाºया हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी केली जात आहे.
पेठ : सध्या राज्यभर कोविड-१९ साथरोगाने थैमान घातले असून, या बिकट आणि धोकेदायक परिस्थितीत रोजंदारीवर काम करणाºया हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत पेठ तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, चार महिन्यांपासून कोरोनासारख्या साथरोगावर नियंत्रण व रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हजारो रोजंदारी वॉर्डबॉय, पारिचारिका, आशासेविका, मदतनीस आपली सेवा बजावत आहे. कोणत्याही प्रकारची नोकरीची हमी किंवा आर्थिक सुरक्षा नसतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य करत आहे. त्यामुळे भविष्यात शासकीय भरती प्रक्रियेत कोरोना लढाईत सेवा बजावणाºया रोजंदारी कर्मचाºयांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष विशाल जाधव, याकूब शेख, विलास
जाधव, नितीन भोये आदींच्या सह्या आहेत.