देश नदीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:27 AM2018-12-25T01:27:43+5:302018-12-25T01:28:04+5:30
सध्या तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न पेटला असताना न्यायडोंगरी, हिंगणे, पिंपरी हवेलीच्या पंचक्र ोशिला कधीकाळी जीवनदायी ठरलेल्या देश नदीच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा आता सोशल मीडियावर गाजतो आहे.
नांदगाव : सध्या तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न पेटला असताना न्यायडोंगरी, हिंगणे, पिंपरी हवेलीच्या पंचक्र ोशिला कधीकाळी जीवनदायी ठरलेल्या देश नदीच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा आता सोशल मीडियावर गाजतो आहे. माजी सभापती विलासराव अहेर यांनी जोपर्यंत पूर्वापार देश नदीचेपाणी न्यायडोंगरी व पंचक्र ोशिला येत नाही तोवर माणिकपुंजच्या पाण्याचा एक थेंबही चाळीसगावला जाऊ देणार नाही, असा इशारा दिला.
महादेव डोंगरावरील वाकड धोधानीपासून उगम असलेल्या देश नदीचे मारवाडी बंधाऱ्याखालील सरंक्षण भिंत तुटल्यामुळे पूर्वापार वाहत असलेल्या नदीने दुसरीकडेच वळण घेतल्यामुळे हिंगणे व न्यायडोंगरी येथील नदीला गेल्या १५ वर्षांपासून पूर येणे बंद झाले आहे ही भिंत चाळीसगाव तालुक्यात येत असल्याने प्रशासनाचे त्याकडे झालेले दुर्लक्ष हा मुद्दा बनला त्यामुळे कधी नव्हे न्यायडोंगरीच्या पाण्याची भीषणता त्यामुळे वाढली आहे. याकडे लक्ष वेधित विलास अहेर यांनी वाकड धोधानीच्या पूर्वपार पाणी वळणाचा मुद्दा उपस्थितीत करीत मन्याड खोºयातील पाण्याचे समान न्याय वाटपाकडे लक्ष वेधले.