सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:19 PM2020-06-12T21:19:58+5:302020-06-13T00:15:30+5:30

नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, त्यासाठी ठेकेदार कंपनीने उमेदवारांकडून पंधरा हजार रुपये वसूल केले जात असल्याच्या आरोपामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहेत.

Demand for Rs. 15,000 for recruitment of cleaners | सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपयांची मागणी

सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपयांची मागणी

googlenewsNext

नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, त्यासाठी ठेकेदार कंपनीने उमेदवारांकडून पंधरा हजार रुपये वसूल केले जात असल्याच्या आरोपामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहेत. अशाप्रकारे नियमबाह्य पद्धतीने वसुली सुरू असून, ठेकेदाराची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक आणि अन्य पक्षांनी केली आहे.
संबंधित ठेकेदार कंपनीने ही वैधमार्गाने घेतली जाणारी रक्कम असून, ती साहित्य सुविधा म्हणून वापरली जाणार आहे. शिवाय ती अनामत रक्कम असल्याने काम सोडणाऱ्या कामगाराला परत केली जाणार आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. आत्तापर्यंत पाचशे कामगारांची भरती ठेकेदाराने पूर्ण केली आहे. मात्र, त्यातून वाद सुरू झाले आहेत. ठेकेदार प्रति उमेदवार १५ हजार रुपये आकारत असल्याची तक्रार असून, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल, दिनकर पाटील, म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी केली आहे.
--------------------------
सदरची रक्कम ही अनामत रक्कम म्हणून आहे. त्यातही कंपनीमार्फत दोन गणवेश, हँडग्लोज, गमबुट आणि कचरा उचलण्यासाठी व्हील बरोज व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जीपीएस यंत्रणा यासाठी हा खर्च आहेच, परंतु कोणी कामगार आठ-दहा-पंधरा दिवसांत सोडल्यास सुरक्षितता म्हणून ही अनामत रक्कम घेतली जात आहे, असे वॉटरग्रेसचे संचालक चेतन बोरा यांनी कळवले आहे.

Web Title: Demand for Rs. 15,000 for recruitment of cleaners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक