सप्तशृंगगडाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्याची मागणी
By admin | Published: March 10, 2017 01:20 AM2017-03-10T01:20:19+5:302017-03-10T01:20:59+5:30
मालेगाव : सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करून विकासकामे करण्याच्या सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.
मालेगाव : भाविकांचे श्रद्धास्थान व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करून विकासकामे करण्याच्या सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.
श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सोयीसुविधांअभावी भाविकांचे हाल होत आहेत. तीर्थक्षेत्राचा विकास करावा या मागणीसाठी सप्तशृंगगडाचे प्रभारी सरपंच राजेश गवळी, उपसरपंच बाळासाहेब वरगळ, दीपक जोरवलकर, विनय जाधव, ग्रामसेवक आर.बी. जाधव यांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत गडाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करावा, अशी मागणी केली. यापूर्वीच ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी सचिवांना केल्या आहेत.
(प्रतिनिधी)