उन्हाळयात शाळा सकाळच्याच सत्रात भरविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 05:44 PM2019-03-28T17:44:36+5:302019-03-28T17:44:41+5:30
विद्यार्थी,शिक्षक शाळा प्रशासनाला वेठीस धरणारा हा निर्णय त्विरस मागे घ्यावा व उन्हाळा काळातील शाळा सकाळच्याच सत्रात भरवाव्यात अशी मागणी राष्ट्रीय बालक,पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीने पत्रकाद्वारे केली आहे.
येवला :शैक्षणकि वर्षे २०१८-१९ द्वितीय सत्रातील राज्यातील सर्व प्राथमिक शाळा ह्या राज्यातील अतितीव्र उन्हाळा व दुष्काळाच्या पाशर््वभूमीवर दरवर्षी प्रमाणे दि.१मार्च २०१९ पासून सकाळच्या सत्रात घेतली जाते ती गोष्ट प्रसंगानुरूप योग्य व विद्यार्थी,शिक्षक शाळा प्रशासनास सोयीची असूनही दि.२८ मार्च पासून पुन्हा जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा भर उन्हाळ्यात पूर्ववत सकाळी १०:४० ते सायंकाळी ५ अर्थात दिवसभर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने (शिक्षण विभाग) जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी यांचे मार्फत शाळा प्रशासनास दिले आहे.
ग्रामीण,दुर्गम भागात उन्हाची तीव्रता प्रवास साधनांची गैरसोय,पाण्याची तीव्र टंचाई आण िगैरसोय लक्षात घेऊन विद्यार्थी,शिक्षक शाळा प्रशासनाला वेठीस धरणारा निर्णय मागे घ्या,उन्हाळा काळातील शाळा सकाळच्याच सत्रात भरवाव्यात असे मत अध्यापकभारतीचे संस्थापक एस.डी.शेजवळ,अध्यक्ष विनोद पानसरे,पालक प्रतिनिधी विनता सरोदे आदी सह पालक शिक्षक प्रतिनिधी यांनी केली आहे.