शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 05:49 PM2019-07-16T17:49:04+5:302019-07-16T17:49:15+5:30

सिन्नर : शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघामार्फत एल्गार आंदोलन उभारण्यात येणार आहे

The demand for school nutritious dietary problems | शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्याची मागणी

शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्याची मागणी

googlenewsNext

सिन्नर : शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघामार्फत एल्गार आंदोलन उभारण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाची गुरूवारी (दि.२५) आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.
विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजना मध्ये स्थानिक पौष्टिक आहार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता तांदळाच्या खिचडीचे प्रमाण कमी होऊन पौष्टिक असलेल्या ज्वारी, बाजरी व नाचणीचा समावेश केला आहे. आॅक्टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना हा पोषक आहार मिळेल हे जर खरे असले तरी याचा त्रास मुख्याध्यापकांना अगर शिक्षकांना होता कामा नये अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे.
मानधन व खर्च अनुदान मिहन्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे शिजवणारे यांना चांगला आहार देण्यासाठी बोलता येत नाही. धान्य व धान्यादी मालसाठा करण्यास अनंत अडचणी येतात यासाठी मध्यवर्ती किचन शेड दया. महिन्याचाच साठा नियमित द्या. पुरवठादारांकडूनच समक्ष वजन करून घ्यावा. तालुक्यात स्वतंत्र कायम पुर्ण वेळ अधिक्षक व इतर यंत्रणा असाव्यात.

Web Title: The demand for school nutritious dietary problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा