स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 04:58 PM2018-12-27T16:58:20+5:302018-12-27T16:58:54+5:30

सटाणा : तालुक्यातील कोळीपाडा शासनाच्या डिजिटल धोरणानुसार आॅनलाईन लोकेशनला प्राप्त होत नसल्याने ग्रामस्थांना सातबारे उतारे तर विद्यार्थ्यांना शैक्षणकि दाखले मिळत नाही. आॅनलाईन अर्ज भरता येत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरु णांचे भवितव्य अंधारात आहे. विविध शासकीय योजनांपासून गावाला वंचित राहावे लागत असल्याने गावाचा विकासही खुंटला आहे.

 The demand for setting up an independent Gram Panchayat | स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी

सटाणा तालुक्यातील कोळीपाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी या मागणीसाठी तहसिलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्देकोळीपाडा गावाचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास ग्रामस्थांना कामकाजाच्या दृष्टीने सोईचे होईल.

सटाणा : तालुक्यातील कोळीपाडा शासनाच्या डिजिटल धोरणानुसार आॅनलाईन लोकेशनला प्राप्त होत नसल्याने ग्रामस्थांना सातबारे उतारे तर विद्यार्थ्यांना शैक्षणकि दाखले मिळत नाही. आॅनलाईन अर्ज भरता येत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरु णांचे भवितव्य अंधारात आहे. विविध शासकीय योजनांपासून गावाला वंचित राहावे लागत असल्याने गावाचा विकासही खुंटला आहे. शासनाने कोळीपाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशी मागणी कोळीपाडा व दोधेश्वर ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोळीपाडा ग्रामस्थांनी ग्रामसभेत या विषयासंदर्भात ठराव केलेला आहे. ग्रामस्थांनी आज बागलाणचे तहसिलदार प्रमोद हिले व गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि ठरावाची प्रत व निवेदन दिले. निवेदनात, १९६७ मध्ये कोळीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत अमरावतीपाडा, कोळीपाडा व दोधेश्वर या तीन गावांची एकित्रत ग्रुप ग्रामपंचायत आहे. कोळीपाड्याची लोकसंख्या अडीच हजारांहून अधिक आहे. कोळीपाडा व दोधेश्वर गावातील शंभर टक्के ग्रामस्थ कोळी महादेव व भिल्ल या अनुसूचीत जमातीचे आहेत. मात्र कोळीपाडा हे गाव महसुली नसल्याने कोणतेही आॅनलाईन काम करता येत नाही. शासनाच्या धोरणानुसार शैक्षणकि व नोकरीसाठी अर्ज दाखल भरताना आॅनलाईन लोकेशनला कोळीपाडा गाव येत नाही. त्यामुळे शेतकरी ग्रामस्थांना सातबारे उतारे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळत नाहीत. नोकरीसाठी अर्ज भरता येत नसल्याने गावातील अनेक होतकरू सुशिक्षति तरु णांचे भवितव्य अंधारात आहे. ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून विकास करणेही जिकरीचे झाले आहे. कोळीपाडा गावाचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास ग्रामस्थांना कामकाजाच्या दृष्टीने सोईचे होईल. याबाबत तातडीने कार्यवाही करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच सखाराम जाधव, उपसरपंच भाऊसाहेब पानसे, ग्रामसेवक नीता देवरे, अर्जुन गातवे, पंडित गातवे, खुशाल गातवे, राधेशाम घोडे,नानाजी गातवे, भारत गातवे, शिवाजी जाधव, बापू येडे, आण्णा घुटे, रतन जाधव, पंकज भांगे, भिका भांगे, शांताराम भोईर, बाळू येडे, अंकुश लव्हारे,संतोष गातवे, विठोबा गातवे, भगवान भांगे, संदीप अिहरे, रोशन भांगे, बाळू सोनवणे, मोहन सोनवणे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
 

Web Title:  The demand for setting up an independent Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.