दिंडोरीत कोविड रुग्णालय उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:05+5:302021-04-11T04:15:05+5:30
सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे खेडोपाडी सर्वत्र कोरोनाचे रुग्ण दिसून येत आहेत. अनेक रुग्ण शेवटच्या ...
सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे खेडोपाडी सर्वत्र कोरोनाचे रुग्ण दिसून येत आहेत. अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्यात दवाखान्यात येत असल्याने डॉक्टरांचीसुद्धा डोकेदुखी वाढली आहे. शहरातील कोविड रुग्णालयामध्ये जागा शिल्लक नसल्याने सर्वत्र पळापळ सुरू असल्याचे चित्र आहे. दिंडोरीतून नाशिकला रुग्ण पाठवावे लागत आहेत. तर नाशिकलासुद्धा रुग्णाला दाखल करून घेत नसल्याने नागरिकांना कुणाचाही आधार मिळणे अवघड झाले आहे. रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ऑक्सिजन बेड संख्या वाढत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. दिंडोरीत एकाही डॉक्टरकडे ऑक्सिजन बेड शिल्लक नाही. या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालयाची तत्काळ निर्मिती करावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सतीश देशमुख, सचिन देशमुख, अॅड. गणेश बोरस्ते, संतोष मुरकुटे, बापू जाधव, सुजीत मुरकुटे, गुलाब गांगोडे, संदीप जाधव आदींनी केली आहे.