सटाणा-खामखेडा-बेज-मार्गाने नाशिक बस सुरु करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 06:51 PM2019-05-12T18:51:01+5:302019-05-12T18:51:18+5:30
खामखेडा : सटाणा-खामखेडा-बेज मार्गाने नाशिक जाण्या-येण्यासाठी बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी खामखेडा, पिळकोस, भादवण विसापुर, बेज आदि परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खामखेडा : सटाणा-खामखेडा-बेज मार्गाने नाशिक जाण्या-येण्यासाठी बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी खामखेडा, पिळकोस, भादवण विसापुर, बेज आदि परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
साक्र ी-नामपुर-सटाणा-पिपळदर-खामखेडा-पिळकोस-बेज-कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक १७ असून सदर रस्त्यावर भादवण-बेज गावादरम्यान गेल्या पंधरा वर्षापुर्वी पुल बांधून हा १७ क्र मांकाचा रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्ता तयार करत्या वेळस परिसरातील नागरिकांना नाशिक जाण्यासाठी थेट गावाहुन बस सुरु होईल अशी अपेक्षा होती. परंतु सदर रस्ता वाहतुकीस खुला होऊन दहा वर्षाहुन अधिक कालावधी होऊनही या रस्त्यावर अजुन नाशिक जाण्या-येण्यासाठी बस नाही. परिसरातील नागरिकांना अनेक कारणांमुळे नाशिक येथे जावे लागते. तसेच नाशिक जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर बस सेवा सुरु केल्यास नागरिकांना सोयीचे होणार आहे.
तसेच हा रस्ता नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने नंदुरबार, नावापुर, साक्र ी, धुळे आदि भागातील भाविकाना गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी सटाणाहुन देवळा कळवण असा दुरचे अंतराने जावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. जर या रस्त्यावरुन नंदुरबार, नवापुर, साक्र ी आदि आगारांनी थेट नाशिक बस सेवा सुरु केल्यास भाविकांना थेट नांदुरी गडावर जाण्यासाठी बस तर उपलब्ध होईल त्याच बरोबर या परिसरातील नागरिकांची नाशिक जाण्या-येण्यासाठी सोय होईल. तेव्हा सदर मार्गावर दिवसातुन चार-पाच वेळा बससेवा सुरु करण्यात यावी आशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.