सातपूरला सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:07 AM2018-06-18T00:07:45+5:302018-06-18T00:07:45+5:30
बारावी व दहावीच्या निकालानंतर आता महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची धावफळ सुरू झाली आहे. सातपूर विभागासाठी सेतू केंद्र तथा आपले सरकार केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
सातपूर: बारावी व दहावीच्या निकालानंतर आता महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची धावफळ सुरू झाली आहे. सातपूर विभागासाठी सेतू केंद्र तथा आपले सरकार केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्र्थांच्या सोयीसाठी शहरातील विविध प्रमुख १५ महाविद्यालयांमध्ये आपले सरकार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सातपूर विभागातील हजारो विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात जातात. शिवाय आपले सरकार केंद्र नेमके कोणत्या महाविद्यालयात आहे याची माहिती उपलब्ध होत नसल्याने संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. सातपूर येथील एकमेव असलेल्या जनता विद्यालयात आपले सरकार केंद्र देण्यात आल्याचे प्रशासनाचे निर्देश होते. प्रत्यक्षात या महाविद्यालयाला कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सातपूरला लवकरात लवकर आपले सरकार केंद्र सुरू करावे, अशी पालकांची मागणी आहे.