कोविड सेंटरर्सला बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:40 PM2020-07-23T21:40:09+5:302020-07-24T00:22:36+5:30

येवला : ग्रामीण क्षेत्रातील सर्व सीसीसी व डीसीएचसी सेंटरर्सला २४ तास पोलीस बंदोबस्त द्यावा व नगरसूल प्रकरणी संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, अशी विनंती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या घटना व्यवस्थापक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Demand for settlement to Covid Centers | कोविड सेंटरर्सला बंदोबस्ताची मागणी

कोविड सेंटरर्सला बंदोबस्ताची मागणी

googlenewsNext

येवला : ग्रामीण क्षेत्रातील सर्व सीसीसी व डीसीएचसी सेंटरर्सला २४ तास पोलीस बंदोबस्त द्यावा व नगरसूल प्रकरणी संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, अशी विनंती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या घटना व्यवस्थापक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
नगरसूल (ता. येवला) येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये नागडे येथील ६२ वर्षीय बाधित महिलेचा कोविड साथरोगाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर त्याच रात्री (दि. २०) मृत महिलेचा मुलाने डीसीएचसी नगरसूल येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दगडफेकही केली.
काही दिवसांपूर्वीच मनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रावर जमावाने हल्ला केल्याची घटना ताजी असताना अशा घटनांमुळे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारीवर्गाचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तसेच नाशिक ग्रामीण भागात अशा घटना वारंवार घडत असल्याचे सदर पत्रात बनसोड यांनी म्हटले आहे. पत्राची प्रत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे.

Web Title: Demand for settlement to Covid Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक