सातबारा कोरा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:46 AM2019-11-28T00:46:47+5:302019-11-28T00:48:43+5:30
कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घालून १०० टक्के पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कळवण तालुक्यात परतीच्या पावसाने कांदे, कांदा उळे, मका, बाजरी, सोयाबीन, भात, नागली, वरई अशा सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला असून, शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
पुढील हंगाम कसा करावा अशा द्विधा मन:स्थितीत बळीराजा सापडला आहे. शासनातर्फे दिली जाणारी हेक्टरी आठ हजार रुपये मदत अत्यंत तुटपुंजी असून, ही मदत वाढवून मिळावी, पीकविम्याचीही मदत शेतकºयांना तातडीने द्यावी तसेच सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, संभाजी पवार, शहरप्रमुख साहेबराव पगार, शीतलकुमार अहिरे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.