कोळगंगा नदीचा प्रवाह सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:09 PM2020-09-20T23:09:46+5:302020-09-21T00:55:29+5:30
येवला : तालुक्यातील बोकटे येथील कोळगंगा नदीचा अडलेला प्रवाहत सुरळीत करण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे एका निवेदनाद्वारे बोकटे ग्रामस्थांनी केली आहे.
येवला : तालुक्यातील बोकटे येथील कोळगंगा नदीचा अडलेला प्रवाहत सुरळीत करण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे एका निवेदनाद्वारे बोकटे ग्रामस्थांनी केली आहे.येवला दौर्यावर आलेल्या भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. नदीपात्रात ग्रामपंचायतीने वाळु मिश्रीत मातीचा उंच बंधारा घातल्याने कोळगंगा नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने सुरू झाला आहे. परिणामी बोकटे गाव पुररेषेत आले आहे. अंदरसुल परिसरात 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने बोकटे येथे कोळगंगा नदीला पूर आला. मातीच्या बंधार्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला आण िपाण्याचा पूर्ण तुंब हा गावातील कोंबडवाडी या वस्तीत घुसले, असे सदर निवेदनात म्हटले आहे.
तसेच मातीच्या बंधार्?याच्या सांडीचा प्रवाह गावाच्या दिशेने बोकटे-अंदरसुल रोड लगत बांधकाम विभागाच्या साईट गटारातून काढल्याने बोकटे गावाचा महत्वाचा रस्ता नदीच्या पात्रातील पाण्याच्या तीव्र गती व पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाने खचला आहे. यात गावातील पाणी बाहेर काढण्यासाठी टाकलेल्या नळ्यांच्या मोरीचे (पुलाचे) बांधकाम वाहून गेले व छोट्याशा व्यावसायीकांचे दुकानेही खसळली आहे. भविष्यात अधिक पावसाने पूर्ण गावात पुराचे पाणी घुसून खूप मोठा संभाव्य जीवितहानीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा अडलेले प्रवाह तातडीने सुरळीत करून रस्ता दुरूस्त करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समतिी तालुकाध्यक्ष हितेश दाभाडे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष किरण दाभाडे, जालिंदर दाभाडे, संजय दाभाडे, अमोल निकम, राहुल माळी, अनिल मोरे, एकनाथ खुरसणे, भागीनाथ मोरे, भरत मोरे, देविदास मोरे, विजय गायकवाड, ललिता माळी, विनोद माळी, कैलास माळी, बाबासाहेब मोरे, सचिन माळी, नंदा निकम, प्रतीक भालेराव, चित्रा मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, किरण माळी, रामदास मोरे, सतिष माळी, रवींद्र मोरे, दिपक मोरे, मंगल साळवे, भामा साळवे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.