वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 00:19 IST2021-04-24T21:13:13+5:302021-04-25T00:19:14+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक आणि देशमाने येथे मागील काही महिन्यांपासून मुखेड महावितरण कडून सिंगल फेज वीजपुरवठा सुरू असताना, ओव्हरलोडमुळे तीनपैकी एक फेज बंद करून, ऐन रात्रीच्या वेळी दीड ते दोन तासांसाठी कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक आणि देशमाने येथे मागील काही महिन्यांपासून मुखेड महावितरण कडून सिंगल फेज वीजपुरवठा सुरू असताना, ओव्हरलोडमुळे तीनपैकी एक फेज बंद करून, ऐन रात्रीच्या वेळी दीड ते दोन तासांसाठी कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे.
संध्याकाळी ५ वाजेनंतर आणि ऐन वेळी पहाटे ५ वाजेनंतर हा वीजपुरवठा कधीही कमी दाबाने केला जात असल्याने, मीटरधारकांना बिले भरूनही अंधारात राहण्याची वेळ येत आहे. शनिवारी (दि.२४)ही हा सिंगल फेज योजनेचा वीजपुरवठा पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड तासांसाठी बंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे, जेव्हा ओव्हरलोडमुळे तीन फेजपैकी अनेकदा एकच फेज सातत्याने बंद केला जात असतो. सातत्याने एक फेजवर दीड ते दोन तास कमी दाबाने वीजपुरवठा न करता तीनही फेजवर हा कमी दाबाने वीजपुरवठा समान वेळेत करणे गरजेचे आहे. मानोरी बुद्रुक आणि देशमाने येथे ओव्हरलोड मुळे कमी दाबाने होणारा वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.