उन्हाच्या तीव्रतेमुळे शीतपेयांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 11:21 PM2021-04-03T23:21:35+5:302021-04-04T00:29:53+5:30

शिरवाडे वणी : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे निफाड तालुक्यामध्ये ठीकठिकाणी शीतपेयांना मागणी वाढली असून बऱ्याच ठिकाणी रसवंतीगृहे सुरु झाली असून सोशल डिस्टन्स ठेवत ग्राहक त्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

Demand for soft drinks due to the intensity of summer | उन्हाच्या तीव्रतेमुळे शीतपेयांना मागणी

उन्हाच्या तीव्रतेमुळे शीतपेयांना मागणी

Next
ठळक मुद्देउन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

शिरवाडे वणी : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे निफाड तालुक्यामध्ये ठीकठिकाणी शीतपेयांना मागणी वाढली असून बऱ्याच ठिकाणी रसवंतीगृहे सुरु झाली असून सोशल डिस्टन्स ठेवत ग्राहक त्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून तापमानात कमालीचा बदल झाला असल्यामुळे उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळी आठ वाजेपासूनच कडख उन अनुभवयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांची धाव थंड गारवा मिळेल अशा शीतपेयांकडे जात आहे. सद्यस्थितीत येथील परिसरात ३५ अंश डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान आले असून कडक उन्हाळा जाणवत आहे.

मागील महिन्यात दिवसा ऊन रात्री थंडी पहाटे दव अशा स्वरूपाचे वातावरण असल्यामुळे फारसे उनाचे पडसाद उमटले नव्हते. परंतु होळी नंतर उन्हाच्या तीव्रतेमधे प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता भयंकर वाढत असल्यामुळे नागरिकांची उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे.
गावात रोडच्या कडेला बऱ्याच प्रमाणात रसवंती गृहे सुरु झाली असून प्रति वर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाचे भाव कमी असल्यामुळे रसवंती गृहांकडे बहुतेक व्यवसायिक वळलेले आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी पाहिजे तेवढा पायंडा व निर्बंध नसल्यामुळे कोरोना रोगाचे नियम पायदळी तुडवीत नागरिक विना मास्क फिरताना दिसत आहेत. थंडपेयांबरोबरच हॉटेलमधे फास्ट फुड चाही आनंद घेताना दिसत आहेत.
नागरीक सुरक्षीततेच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक मशीनचा रसाला पसंती देताना दिसत आहेत. कोरोना रोगाचा पार्श्वभूमीवर नाही म्हटले तरी बऱ्याच व्यवसायांवर बहुतांशी परिणाम झाला असून काही नागरिक आजही स्वतःची काळजी घेण्यासाठी घराबाहेर न पडता किंवा बाहेर गेल्यानंतर कुठेही काहीही खाणेपिणे न करता घरी राहण्याच्या शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करताना दिसत आहेत. (०३ रसवंती गृह १)

Web Title: Demand for soft drinks due to the intensity of summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.