मालेगाव शहरातील विजेच्या समस्या सोडविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:11+5:302021-03-25T04:15:11+5:30
मालेगाव : येथील वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नाही. भारनियमन, अवाजवी बिले, विनापरवानगी मीटर बदलणे, चुकीची ...
मालेगाव : येथील वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नाही. भारनियमन, अवाजवी बिले, विनापरवानगी मीटर बदलणे, चुकीची वीजबिले अदा करणे, आदी तक्रारी वाढल्या आहेत. या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी मालेगाव अवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांनी मुख्य कार्यकारी अभियंता जे. के. भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यंत्रमाग व्यवसायाला सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्यामुळे हा व्यवसाय कोलमडून पडत आहे. तसेच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांवर अन्याय केला जात आहे. विनाकारण मीटर बदलणे, अवाजवी बिले अदा करणे, वीजचोरी होत असलेल्या फिडरवरील वीजपुरवठा खंडित करणे, सक्तीची वसुली करणे असे प्रकार वाढले आहेत. या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी रिजवान बॅटरीवाला यांच्यासह ग्राहकांनी केली आहे.