कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:38 PM2020-08-24T23:38:07+5:302020-08-25T01:19:05+5:30
नाशिक : महापालिकेच्या सातशे सफाई कामगारांच्या बदल्या त्वरीत रद्द कराव्या तसेच अनुकंपा आणि अन्य समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी भारतीय बाल्मिकी नवयुवक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
नाशिक : महापालिकेच्या सातशे सफाई कामगारांच्या बदल्या त्वरीत रद्द कराव्या तसेच अनुकंपा आणि अन्य समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी भारतीय बाल्मिकी नवयुवक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
यांसदर्भात संघघटेनेचे अध्यक्ष अनिल बहोत यांनी महापालिका आयुक्त राधाकृण गमे यांना निवेदन दिले आहे. तसेच कॉँग्रेसनेत्या सोनीया गांधी व राहूल गांधी यांची भेट देऊन नाशिकमध्ये सफाई कामगारांवर होत असलेल्या अत्याचारांची माहिती देणार असल्याचे बहोत यांनी सांगितले. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत काम करणाऱ्या सफाई कामगारांची संख्या मुळातच कमी आहे. त्यातच महापालिकेने आऊटसोर्सिंगने सातशे सफाई कामगारांची नियुक्ती केली आहे. त्यांना पूर्व आणि पाश्चिम भागात नियुक्त करून अन्य सातशे कामगारांची शहराच्या अन्य भागात बदली करण्यात आली. त्यामुळे अनेक कामगारांचे हाल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने बदल्या रद्द कराव्यात आणि रिक्त जागांसाठी भरती मोहिम राबवावी अशी मागणी बहोत यांनी केली आहे.