सातपूरला कोरोना सेंटर सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:15 AM2021-03-31T04:15:37+5:302021-03-31T04:15:37+5:30

महानगरामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे.सातपूर विभागामध्ये कष्टकरी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या साधारण रुग्णांना घर ...

Demand to start Corona Center at Satpur | सातपूरला कोरोना सेंटर सुरु करण्याची मागणी

सातपूरला कोरोना सेंटर सुरु करण्याची मागणी

Next

महानगरामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे.सातपूर विभागामध्ये कष्टकरी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या साधारण रुग्णांना घर छोटे असल्याने घरातील इतरांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अतिशय भीतीदायक वातावरणात जीवन जगावे लागत आहे. ज्यांना ऑक्सिजन,व्हेंटिलेटरची गरज आहे अशा गरीब रुग्णांसाठी सातपूर विभागात महानगरपालिकेची व्यवस्था नसल्याने खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. कोरोनामुळे सातपूर विभागातील नोकरी व्यवसायावर मोठा प्रभाव पडला आहे.सर्वसाधारण उत्पन्न असणाऱ्या सातपूर विभागातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.पैशाच्या चणचणीमुळे कोरोना पॉझिटिव्ह नागरिकही घरीच उपचार घेणे पसंत करीत आहे.यातून त्यांच्या कुटुंबीयांना व समाज जीवनाला संसर्गाचा मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून सातपूर विभागासाठी ऑक्सिजनच्या 100 बेड सुविधेसह 500 बेडचे कोरोना केअर सेंटर तातडीने उभारावे अशी मागणी प्रभाग क्रमांक 9 च्या नगरसेविका डॉ.वर्षा भालेराव यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Demand to start Corona Center at Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.