खासगी क्लासेस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:48 PM2020-08-05T22:48:19+5:302020-08-06T01:37:29+5:30
मालेगाव : मर्यादित विद्यार्थिसंख्येचा नियम बनवून खासगी क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मालेगाव कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे कृषिमंत्री दादा भुसे याना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मर्यादित विद्यार्थिसंख्येचा नियम बनवून खासगी क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मालेगाव कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे कृषिमंत्री दादा भुसे याना देण्यात आले.
कमी विद्यार्थिसंख्या घेऊन व सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून खासगी क्लासेस बंद आहेत. तो काळ वार्षिक परीक्षांचा होता. मोठ्या प्रमाणात फी विद्यार्थ्यांकडे शिल्लक राहिली होती; परंतु क्लासेस बंद झाल्याने वसुली झाली नाही. सर्व खाजगी क्लासेसच्या वर्षभराच्या मेहनतीवर संपूर्णत: पाणी फिरून सर्वांवर बेरोजगारीबरोबरच आर्थिक संकट कोसळले आहे. पालकांचे विद्यार्थ्यांना क्लासेसला पाठवण्याबाबतचे संमतीपत्र घेण्याबरोबरच क्लासेसचे जंतुनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याच्या अटींवर क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. यावेळी संजय हिरे, प्रमोद देवरे, अंकुश मयाचार्य, योगेश पवार, अमोल अहिरे, डी.एल. अहिरे, रामदास नवगिरे, ममता मेहता, दिनेश श्रीखंडे, राकेश पवार, पवन पगारे, सुमित पाटील, सुजाता नवगिरे, निवृत्ती कोते, नरेंद्र यादव, गौरव मंडाळे आदी शिक्षक उपस्थित होते.