नांदूरशिंगोटे येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:43+5:302021-05-06T04:15:43+5:30
सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील सावळागोंधळ गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ऐकावयास मिळत असल्याकारणाने ग्रामीण भागातून जिल्हा ग्रामीण रुग्णालयात रुग्ण ...
सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील सावळागोंधळ गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ऐकावयास मिळत असल्याकारणाने ग्रामीण भागातून जिल्हा ग्रामीण रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यास नातेवाईक धजावत नाही. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. खासगी दवाखाने गरीब जनतेला परवडणारे नाही. दोडी ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत दोडी अथवा नांदूरशिंगोटे येथे दापूरप्रमाणे विलगीकरण कक्ष स्थापन करावा, अशी मागणीही बर्के यांनी केली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून मृत्यूचे प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात वाढले आहे. दापूर, दोडी, नांदूरशिंगोटे, मानोरी, कनकोरी, सुरेगाव, चास, नळवाडी असा बहुतांश भाग नांदूरशिंगोटे गावाला जवळचा आहे. येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने खरेदी-विक्रीसाठी दररोज वर्दळ असते. नांदूरशिंगोटे येथे कोविड सेंटर अथवा विलगीकरण कक्ष उभारल्यास निश्चितपणे या भागातील नागरिकांना त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना नेते उदय सांगळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.